Share

शेन वॉर्नवरील वादग्रस्त वक्तव्यासाठी सुनील गावस्करांनी मागितली माफी

Published On: 

मुंबई: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या निधनानंतर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना कररिकेत रसिकांकडून मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. आता गावस्करांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी स्पष्टीकरणही दिले आहे.

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गावस्कर (sunil gavaskar) यांनी वॉर्नच्या (shane warne) निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता, पण ते पुढे म्हणाले कि शेन वॉर्नला ते महान खेळाडू मानत नाहीत. तेव्हापासून, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे नुकतेच निधन झाले असताना वॉर्नच्या महानतेबद्दल बोलल्याबद्दल गावस्करांना टीकेचा सामना करावा लागला. याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले “गेल्या आठवडा क्रिकेट जगतासाठी अत्यंत क्लेशकारक होता, कारण २४ तासात आपण खेळाचे दोन आयकॉन गमावले – रॉडनी मार्श आणि शेन वॉर्न. टीव्हीवर, मला एका अँकरने विचारले की वॉर्न महान स्पिनर आहे का आणि मी माझे प्रामाणिक मत दिले.”

https://www.instagram.com/tv/CazXPhilwYG/?utm_source=ig_web_copy_link

सुनील गावस्कर यांनी आपली चूक लक्षात घेता पुढे सांगिलते “मागे पाहता, तो प्रश्न मला विचारायला पाहिजे नव्हता आणि मी उत्तरही दिले नसते कारण कोणत्याही तुलना किंवा मूल्यमापनासाठी ती योग्य वेळ नव्हती. वॉर्न हा खेळातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक होता. रॉडनी मार्शही सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो,” चाहत्यांच्या टीकेनंतर गावस्करांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!