Share

पेट्रोल स्वस्त झाल्याने सर्वसामान्य आनंदी तर पंपचालक निराश; बंद पुकारण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : सतत वाढत असलल्या इंधन दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल 5 आणि डिझेलच्या दरात  10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे.  मात्र एककीकडे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे मात्र पेट्रोल पंपचालकांची डोकेदुखी वाढली आहे.

अचानक झालेल्या कपातीमुळे पेट्रोलपंपचालकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पंपचालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिवाळीचा सण असल्यामुळे तीन दिवस सुट्ट्या आल्या आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी चढ्या दराने इंधन खरेदी केलं होतं. पण, आता पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. इतक्या मोठ्या फरकाने दर कमी झाल्याने पेट्रोल पंप चालकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

फामफेडा राज्य संघटना पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध म्हणाले, ‘मोदी सरकारने नुकतेच हे धोरण जाहीर केले आहे. मागेही दरकपात झाली होती. त्यावेळी उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे रिटेल दरावरही परिणाम झाला होता. हा निर्णय ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. पण पेट्रोल पंपचालकांचा दिवाळीत दिवाळं निघणारा हा निर्णय आहे. हा निर्णय अत्यंत क्रुर आणि अविचारी आहे. आंतरराष्ट्रीय दरावर इंधनाचे रोजचे दर ठरत असतात.’

पुढे ते म्हणाले, अचानक एवढा मोठा बदल होणार असेल तर तो निर्णय संपूर्णपणे राजकीय झाला आहे. याचा पेट्रोल दराशी कोणताही संबंध नाही. सरकारने डीलरचा विचार केला. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पंपचालकांनी टाक्या फूल केल्या आहे, आजचा लॉस आहे तो डीलरचा आहे, एकाच रात्रीत देशभरातील पेट्रोल पंपचालकांचं लाखोचं नुकसान होणार आहे. हे नुकसान भरून न येणारे आहे. यामुळे पंप चालक बंद निराश संतप्त झाले असून पंप चालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!