बीड: वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून ही टोळी आमच्याकडे मुलगी आहे असे सांगून स्थळ दाखवते व लग्नासाठी पैशाची मागणी करुन वारंवार खंडणी वसूल करत. महाराष्ट्रातील काही मोठ्या शहरातील विवाह इच्छुक व्यक्तींना फसवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन जणांना आष्टी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. या घटनेने आष्टीसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका २७ वर्षीय तरुणासोबत लातूर येथील सोनाली गणेश काळे यांचा मंगळवारी आष्टी येथील गणपती मंदिरात विवाह संपन्न झाला. परंतु लग्नाच्या दिवशी रात्री सदरील महिलेने आपल्या पतीला २ लाख रुपये दे अन्यथा मला फसवून आणून माझ्यावर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्यानंतर पतीच्या पायाखालील जमीन सरकली.
सदरील तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने आष्टी पोलिसांना ही माहिती दिली. आष्टी पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करणाऱ्या अजय महारुद्र चवळे व सोनाली गणेश काळे यांना पन्नास हजाराची खंडणी घेताना आष्टी येथे शनिवारी त्या टोळीला रंगे हात पकडण्यात यश आले. प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-20 सामन्यातून ‘या’ ओपनरचा होऊ शकतो पत्ता कट
- सुर्यकुमारने झेल सोडताच विराटच्या चेहऱ्यावर ‘हे’ हावभाव
- पंतसारखा पराक्रम करणे अशक्य – चॅपेल
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

