अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या विजयानंतर सगळीकडुन कौतूकाचा वर्षाव होत आहे. मात्र याला अपवाद ठरला आहे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन. भारताच्या विजयानंतर मायकल वॉनने पुन्हा एकदा खोचक टि्वट करत भारतीय संघापेक्षा मुंबई इंडीयन्स हा संघ सरस आहे असे म्हणाला.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात दोन बदल केले. इशान किशन आणि सुर्यकुमार यादव यांचा समावेश संघात करण्यात आला होता. हे दोन्ही खेळाडू आयपीएल मध्ये मुंबई इंडीयन्स संघाकडून खेळत असतात. त्यातच इशान किशनने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Told you all the @mipaltan were better than India … What a debut @ishankishan51 !! #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
हाच धागा पकडत मायकल वॉनने टि्वट करुन म्हणले आहे की, मी म्हणालो होतो मुंबई इंडीयन्सचा संघ हा भारतीय संघापेक्षा सरस आहे. या टि्वट मध्ये त्याने इशान किशनच्या खेळीचे कौतुक देखील केले आहे. या टि्वट नंतर टि्वटरवर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहे. मात्र कोणत्याही भारतीय खेळाडूने यावर अजुनही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. या सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघाचा ७ गडी राखुन पराभव केला आहे. या विजयाने ५ सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने १-१ अशी बरोबरी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
- चहलचे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’


