अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ गडी राखुन विजय मिळवत ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी भारतीय संघाकडून पदार्पण केले. या सामन्यात इशान किशनने अर्धशतक झळकावत आपली निवड सार्थ ठरवली. मात्र सुर्यकुमार यादवला फलंदाजीची संधीच न मिळाल्याने त्याला काही कामगिरी करण्याची संधी नाही मिळाली.
इंग्लंड संघाची फलंदाजी सुरु असताना १४व्या षटकांत मात्र सुर्यकुमार कडून एक चुक झाली. वॉशिग्टन सुंदरच्या या षटकातील दुसऱ्या चेंडुवर जॉनी बेअरस्टोने डीप मिडविकेटला एक जोरदार फटका मारला. बेअरस्टोने मारलेला बॉल हवेत होता त्यावेळी सूर्यकुमार यादवने तो कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कॅचचा योग्य अंदाज न आल्यामुळे बॉल त्याच्या हाताला लागून बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. आणि बेअरस्टोला त्या बॉलवर सहा रन मिळाले.
ही कॅच सोडताच कर्णधार विराट कोहलीला त्याची निराशा लपवता आली नाही. त्याचे चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. हे भाव कॅमेरात टिपले गेले. मात्र सूर्यकुमार यादवने सुंदरच्या त्याच षटकातील तीन बॉलनंतर सूर्यकुमारनेच बेअरस्टोचा झेल घेतला आणि आपल्या चुकीची भरपाई केली. यावेळी देखील तो झेल जवळपास सुटलाच होता, मात्र सूर्याने तो शेवटच्या क्षणी पकडला आणि धोकादायक बेअरस्टोला माघारी पाठवले.
महत्वाच्या बातम्या
- पंतसारखा पराक्रम करणे अशक्य – चॅपेल
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

