तुळजापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे १६ नोव्हेंबरनंतर ४ महिन्यांनी पुन्हा एकदा रविवारी तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च रोजी इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर ८ महिन्यांनंतर म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे ४ महिन्यांनी पुन्हा एकदा रविवारी तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले.
जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
रविवारी पहिल्याच दिवशी जनता कर्फ्यूला तीर्थक्षेत्र तुळजापुरात नागरिक, व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच सर्व दुकाने, बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. रस्त्यावर शुकशुकाट होता तर मंदिर संस्थानने महाद्वाराचे दरवाजे कुलूप लावून बंद केले होते. दरम्यान जनता कर्फ्यूचा फटका भाविकांना बसला असून महाद्वारातूनच शिखर दर्शनावर समाधान मानावे लागले.
छोट्या मोठ्या व्यावसायिकांचाही प्रतिसाद
जिल्ह्यात जनता कर्फ्यूमुळे शहरातील सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली. नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. दरम्यान प्रशासनाने खबरदारी घेत मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी बॅरिकेडिंग लावली होती. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- लहान मुलांनी भीक मागणे हा कायद्याने गुन्हा; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल
- औरंगाबाद मनपा करणार पाच हजार कोव्हीड बेडची व्यवस्था
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

