अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.
दरम्यान, पंतने आक्रमक पवित्रा घेत मैदानाच्या चारही दिशांना फटकेबाजी करत २६ धावांची छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळी केली. यादरम्यान डावातील १२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंतने जबरदस्त शॉट मारला. पंतच्या या ९० मीटर अंतरावर गेलेल्या खणखणीत षटकाराला पाहून नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला कर्णधार कोहली भलताच खुष झाला.
प्रतिभावान फलंदाज ऋषभ पंतने गेल्या तीन महिन्यांच्या अंतरात तीन कसोटींचा निकाल भारताच्या बाजूने बदलण्यात मोलाची भूमिका बजावली. काही खेळाडूंना संपूर्ण कारकीर्दीतही अशी कामगिरी करता येत नाही, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी पंतचे कौतुक केले. डावखुऱ्या पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या, तसेच इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत निर्णायक खेळी साकारली. त्यामुळे भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के करता आले.
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि ब्रिस्बेन येथे पंतने केलेली फटकेबाजी कौतुकास्पद होती. त्यानंतर अहमदाबाद येथील इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत त्याने शतक झळकावून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. संघ कठीण परिस्थितीत असताना त्याने अशी कामगिरी केली. अनेक खेळाडूंना एकदाही संघासाठी असे योगदान देणे जमत नाही. पंतसारखा खेळाडू लाभणे हे भारताचे सुदैव मानावे लागेल. त्यामुळे भारताच्या तिन्ही संघात त्याला स्थान मिळणे गरजेचे आहे,’’ असे चॅपेल म्हणाले. त्याशिवाय पंतच्या यष्टीरक्षणात सुधारणा झाल्याचेही चॅपेल यांनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- विराटची नाबाद खेळी ; ‘या’ खेळाडूने दिला होता कानमंत्र
- रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली
- दोन दिवसात संपलेल्या कसोटी सामन्यावर आयसीसीचा रीपोर्ट प्राप्त
- चहलचे टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’


