अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.
कर्णधार विराट कोहली आणि पदार्पणवीर ईशान किशनच्या दणदणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या अहमदाबाद येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडला 7 विकेटने धूळ चारली. यासह यजमान भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता मालिकेचा तिसरा सामना उद्या, 16 मार्च रोजी याच मैदानावर खेळला जाणार आहे.
मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने अष्टपैलू कामगिरी केली असली तरी आगामी तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करू शकतात. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या केएल राहुलला तिसऱ्या सामन्यातून बाहेर केले जाऊ शकते तर त्याच्या जागी उपलब्ध असल्यास रोहित शर्माचा समावेश केला होऊ शकतो. राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पहिल्यांदा भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत आहे.
यापूर्वी कसोटी मालिकेत रोहित शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने यजमान संघाकडून मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे, पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यातून हिटमॅनच्या अनुपस्थितीने चाहत्यांसह तज्ञांना देखील धक्का बसला आहे ज्यांनी मुंबईकर फलंदाजाच्या कमबॅकची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतसारखा पराक्रम करणे अशक्य – चॅपेल
- कोरोनामुळे चार महिन्यांनंतर पुन्हा तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद
- विजयानंतर मायकल वॉनची भारतीय संघाची ‘या’ संघासोबत तुलना!
- जालन्यात लॉकडाऊन की कडक निर्बंध? आज होणार निर्णय
- पंतसारखा पराक्रम करणे अशक्य – चॅपेल


