Share

Adipurush । “आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”; भाजपची आक्रमक भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झालायं. मात्र या चित्रपटातील व्हिएफेक्स इफेक्टची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे. तसेच चित्रपटातील पात्रांच्या लुक्सवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य स्टार प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांसारखे लोकप्रिय आणि दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. मात्र या चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा झाली आहे. चित्रपटातील पात्रांच्या लूकवरून वाद निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. यावर आता भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शितच होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.

आमदार कदम यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘आदिपुरुष चित्रपटाला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. हिंदु देवी-देवतांचं विडंबन असणारी आदिपुरुष फिल्म आमच्या महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. कोट्यवधी रुपये कमवायचे म्हणून आमची श्रद्धा, आस्था, देवी-देवतांचं तुम्ही विडंबन कराल, मग निर्लज्जासारखे येऊन माफी मागतील. आता माफीनामा नाही…आता वेळ आलीये फक्त माफीनामा की विडंबन ठरवण्याची’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, आणखी एका ट्विटमध्ये राम कदमांनी म्हटले की, “अभिनेता सैफ अली खानने त्याच्या पुढील चित्रपट ; आदिपुरुष’ संदर्भात धक्कादायक विधान केले आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा सैफअली म्हणतो की, रावणाने सीता माईंचं अपहरण केलं ते चित्रपटात न्याय बाजूने असेल. यामध्ये रावणाची एक मानवीय बाजू दाखवण्यात येईल. प्रभू श्रीरामासोबतचं रावणाचं हे युद्ध चित्रपटात न्यायसंगत ठरेल.” यावर राम कदम यांनी आक्षेप घेतला आहे.

हिंदू महाकाव्य रामायणाचे रूपांतर असलेल्या आदिपुरुषची घोषणा 18 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली प्रभासने भगवान रामाची भूमिका साकारली आहे. सैफ अली खानने रावणाची भूमिका केली आहे. तर क्रीती सनॉनने सीतेची आणि सनी सिंह याने लक्ष्मणाची भूमिका केली आहे. रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खानाच्या लूकवर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच हनुमानाचं चित्रणही चुकीचं केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केलाय. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!