मुंबई: कलर्स टीव्ही वरील लोकप्रिय शो झलक दिखला जा 10 नेहमी चर्चेत असतो. कारण शोमध्ये नेहमी काहीतरी इंटरेस्टिंग घडत असते. शो मध्ये अनेक सेलिब्रिटीज आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करायला. तर काही सोशल मीडिया फेम कार्यक्रमाची शोभा वाढवतात शोमध्ये येत असतात. त्याचबरोबर शो मधील जज माधुरी दिक्षीत नेहमीच आपल्या डान्सने चाहत्यांना आकर्षित करत असते.
यावेळी टांझानिया मधील इंटरनेट सेन्सेशन कीली पॉल (Kili Poul) झलक दिखला जा मंचावर पोहोचला आहे. बॉलीवूडच्या आयकॉनिक गाण्यांवर डान्स करून कीली पॉलने सोशल मीडियावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच, कीली झलक दिखला जा च्या मंचावर माधुरी दिक्षित सोबत बॉलीवूडच्या एव्हरग्रीन हिट गाण्यावर डान्स करताना दिसला आहे.
कीली पॉल चा माधुरी दिक्षीत सोबत डान्स
अलीकडेच, इंटरनेट सेन्सेशन कीली पॉल झलक दिखला जा च्या मंचावर माधुरी दिक्षीत सोबत डान्स करताना दिसला आहे. त्यांनी ‘चने के खेत मे’ या गाण्यावर डान्स केला आहे. कीली माधुरी सोबत या गाण्याचे स्टेप्स जुळव्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांना तो खूप आवडला आहे. चने के खेतं मे हे माधुरी दिक्षीतच्या अंजाम चित्रपटात लोकप्रिय गाणे आहे.
Madhuri Dixit | 'झलक दिखला जा 10' च्या मंचावर Kili Paul सह माधुरी दिक्षीतचे ठुमके pic.twitter.com/LSSDUR7qJQ
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) October 6, 2022
कीली पॉल ची बिग बॉस 16 मध्ये होणार एंट्री
मीडिया रिपोर्ट नुसार, टेलिव्हिजन सेलिब्रिटी सृती झा आणि निशाण भट वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉस 16 मध्ये प्रवेश करणार आहे. या यादीत आणखी एक नाव जोडले जात आहे, ते नाव म्हणजे कीली पॉल. कीली पॉल बिग बॉस मध्ये गेस्ट परफॉर्मर म्हणून दिसणार आहे, अशी बातमी समोर येत आहे. बिग बॉस हाऊसमध्ये कीली इंस्टाग्राम रिल बनवताना दिसणार असून, तो एका टास्कमध्ये अब्दु रोजीक आणि एमसी स्टोन सोबत काम देखील करणार.
महत्वाच्या बातम्या
- BJP | “अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची…”; भाजपचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
- Sushmita Sen | टाळी वाजवतानाच्या पोज मधील सुष्मिता सेन चा ‘किन्नर’ भूमिकेतला लुक, बघून व्हाल थक्क!
- Nilesh Rane | “काल उद्धव ठाकरे यांची बायको आणि दोन शेंबडी पोरं सोडली तर…”, निलेश राणेंचा घणाघात
- Devendra Fadanvis | “ठाकरेंनी स्क्रिप्ट राईटर बदलावा”; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
- Upcoming Car Launch | Tata सफारी इलेक्ट्रिक कार होणार लवकरच लाँच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

