Share

BJP | “अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची…”; भाजपचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

Published On: 

मुंबई : संपुर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेला दसरा मेळावा अखेर काल पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोन वेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे आयोजित केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सडकून टीका केली. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अमित शाह यांना देखील फैलावर घेतलं. अशातच कालच्या दसरा मेळाव्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणालेत प्रसाद लाड?

“सर्जिकल स्ट्राइक कोणी केला याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असल्याचं प्रसाद लाड यावेळी म्हणले. अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची उंची नाही. तुम्ही साधं याकूब मेमनची कबर उकरु शकला नाहीत. अमित शाहांबद्दल, पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलूच नये”,असं देखील लाड म्हणालेत.

“मोदी, शाह हे पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात घेतील हे तुम्हाला कळणारही नाही. तुमची सकाळ दुपारी १२ वाजता होते, त्यामुळे रात्री पाकव्याप्त काश्मीर कधी येईल हे तुम्हाला समजणारही नाही”,असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलायं. आजुबाजूच्या ज्ञान देणाऱ्या त्या चांडाळ चौकडीचं ज्ञान आधी वाढवा,” असंही ते म्हणाले. ‘सोनं नाही तर भंगार लुटलं’ असं म्हंटल लाड यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“जनतेला कोणतंही सोनं मिळालं नाही. सोन्याच्या रुपात पितळही मिळालं नाही. ना चांदी मिळाली, ना पितळ मिळाल, फक्त भंगार मिळालं. भंगारवाल्यांसह सत्तेत राहिल्याने भंगारच लुटायची वेळ आली आहे. भंगारच लुटायचं काम त्यांनी केलं,” अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!