Share

Ajit Pawar | दसरा मेळाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

मुंबई : काल झालेल्या दसरा मेळाव्याकडे (Dussehra Melawa) सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. मेळाव्यानंतर देखील नेत्यांची टिपा-टिप्पणी सुरुच आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची प्रतिक्रिया :

काल एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) तसेच उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) काय मार्गदर्शन झालं हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, मी देखील पाहिलेलं आहे. त्यांनी-त्यांनी त्यांचे विचार सगळ्यांसमोर ठेवले, दोन्ही कडे गर्दी होती, कशी होती हे देखील सर्वांना माहिती आहे, मिडीयाने लोकांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा शिंदेंच्या मेळाव्याला जाणाऱ्यांना माहितंचं नव्हते की ते कुठे चाललेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

काल सकाळी ७ पासून अजित पवार यांचा दिनक्रम व्यस्त होता. मात्र, आईला भेटायला गेल्यानंतर त्यांनी दसरा मेळावा पाहिला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काल अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये असताना त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी अजित पवार यांना कुणाची सभा आधी ऐकणार, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. मी यंदा दसऱ्याला मी माझ्या घरी चाललोय. काटेवाडीत जाऊन मी आईला भेटणार आहे. तिकडं दसरा साजरा करणार आहे. संध्याकाळी सातच्या आसपास या सभा सुरु होतील. आधी उद्धव ठाकरे यांची सभा होईल. ती मी आधी ऐकणार. त्यानंतर मग एकनाथ शिंदे यांची सभा होईल. ती मी ऐकणार, असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!