नवी दिल्ली: काल पासून सुरू असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेश २०२२ (Union Budget Session 2022) च्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सितारामन (FM Nirmala Sitaraman) यांनी पुढील वर्षासाठी (२०२२ – २३) २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. परंतु आज राज्यसभेत मात्र या घोषणेवरून सरकारला विरोधी पक्षाने चांगलेच धारेवर धरले आहे.
देशात बेरोजगारी वाढत असताना, केंद्र सरकार प्रतिवर्षी देशात २ कोटी रोजगार उपलब्ध करणार का? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे ( यांनी उपस्थित केला. तसेच तुम्ही आतापर्यंत किती नोकऱ्या दिल्या ते सुद्धा सांगा असा प्रश्न देखील राज्यसभेत केला. केंद्र सरकारने आता प्रतिवर्षी १५ कोटी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, पण ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील ५ वर्षांसाठी फक्त ६० लाख नोकऱ्यांचेच प्रयोजन सरकारने केले आहे असेही खरगे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
येत्या ७ आणि ८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभेला संकल्पावरील चर्चा आणि वादविवादसाठी संबोधन करणार असल्याची माहिती आहे. हा अर्थसंकल्प ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

