मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (hiv Sena MP Sanjay Raut) यांनी अर्थसंकल्पात गुजरातच्या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईवर अन्याय का केला जात आहे. मुंबईला ओरबाडण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मुंबई कोण ओरबाडते आहे हे सचिन वाजेमुळे लोकांना कळलेच आहे. गेली २५ वर्षे ही बाजीरावकी शिवसेना करते आहे. परंतु हे पहिले बाजीराव नसून दुसरे बाजीराव आहेत, ज्यांनी साम्राज्य बुडवले. त्यामुळे जनता यांना बुडवणार हे नक्की.”, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
मुंबई कोण ओरबाडते आहे हे सचिन वाजेमुळे लोकांना कळलेच आहे. गेली २५ वर्षे ही बाजीरावकी शिवसेना करते आहे. परंतु हे पहिले बाजीराव नसून दुसरे बाजीराव आहेत, ज्यांनी साम्राज्य बुडवले. जनता यांना बुडवणार हे नक्की. https://t.co/bUfpgPSJSr
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 2, 2022
काय म्हणाले संजय राऊत?
“एखाद्या राज्याच्या प्रगतीने आमच्या पोटात दुखण्याची आवश्यकता नाही पण ते करण्यासाठी मुंबईची धूळधाण करणं चालू आहे. मुंबई देशाला सव्वा दोन लाख कोटी रुपये देते. त्यामुळे आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका नाही तर मुंबईचे ते पैसे परत करा”, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
दरम्यान गुजरातच्या गांधीनगरमध्ये उभारली जाणारी गिफ्ट सिटी (Gift City project in Gujarat)ही नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात या गिफ्ट सिटीला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काल अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे पाच वर्षांपूर्वी लवाद केंद्र सुरु करण्यात आले होते. परंतु, आता गुजरातमध्ये नवे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र उभे राहिल्यास मुंबईला आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- विराट कोहलीच्या खास खेळाडूने उघड केले गुपित, सांगितले आयपीएलच्या पहिल्या कमाईतून काय खरेदी केले?
- भाऊ कदम आणि कुशल बद्रिकेला ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटमधून अटक, काय आहे नेमकं प्रकरण
- “आमचं पाकीट मारून, आमच्या पैशावर बाजीरावकी करू नका”, संजय राऊतांचा मोदी सरकारला इशारा
- सर्वसमावेशक महिला धोरणाचा अवलंब लवकरच-यशोमती ठाकूर
- IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये लागणार क्रीडा मंत्र्यावर बोली; जाणून घ्या कोण आहे हा मंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

