Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्याकडे राजकीय डोळा

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पुणे -मुंबई सह महाराष्ट्र राज्यातील एकूण १० महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम येत्या काहीच दिवसात राज्याचा निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे. २३ गावा पुणे शहरात/ पुणे महारानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने पुणे महानगरपालिका महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे. पुणे शहर हे क्षेत्रफळाने महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे. पुण्यात सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.

तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे ,तर काँग्रेस पक्षाची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरात केवळ २ नगरसेवक आहेत. काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेने शहरातील नवीन प्रभाग रचना आणि त्यांच्या नकाशाची यादी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईट वर उपलब्ध करून दिली आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे महानगरपालिकेची सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

तर शिवसेना आणि काँग्रेस काहीश्या प्रमाणात मागे पडलेले  दिसत आहे. एकेकाळी पुणे शहरात ३० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पण पुणे महानगरपेलिकेची निवडणूक मनावर घेतल्याचे दिसत आहे.

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच १७३ जागांवर उमेदवार उभे करण्यापेक्षा ठराविक काहीच जागांवर मनसेचे उमेद्वार उभे करून पक्षाला शहरात पुन्हा उभारी देण्याचे मनसेच्या नेत्यांचे प्रयन्त चालू झाले आहेत. पक्षाच्या सुकाणू समितीच्या बैठकीतही त्याबाबत चर्चा करण्यात आली असून  प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर होण्यापूर्वी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्याबाबत बैठकही झाली.

यामध्ये सर्व जागा लढविण्याऐवजी काही जागांवरच लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकी मध्ये  पक्षाचे नेते अनिल शिदोरे, बाबू वासस्कर, वसंत मोरे, किशोर िशदे, साईनाथ बाबर, गणेश सातपुते, बाळा शेडगे, योगेश खैरे, रणजित शिरोळे, संतोष पाटील आणि वनिता वागस्कर  उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!