औरंगाबाद : भागवत कराड यांच्या रूपाने जिल्ह्याला पहिले केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. यापूर्वी जिल्यात केंद्रीय मंत्री पद कोणालाच मिळाले नाही. बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या विस्तारात खा. डॉ भागवत कराड यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे. सायंकाळी ते राष्ट्रपती भवन येथे शपथ घेणार आहे.
शहराला अनेक मात्तबर खासदार मिळाले परंतु केंद्रीय मंत्री पद खेचून आणण्यात कोणालाच यश आले नाही. डॉ. कराडांनी राज्यसभेच्या खासदारकीसह आता थेट मंत्री पदच मिळवले त्यामुळे आता पुन्हा शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेना-भाजप युती मध्ये मागच्या सरकारमध्ये मंत्री पद मिळण्याचे संकेत मिळाले होते. परंतु जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी ते खेचून नेले होते.
डॉ. कराडांना मिलेल्या मंत्री पदामुळे आता जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यात केंद्राची स्मार्ट सिटी योजना कार्यान्वित आहे. त्यालाही गती मिळेल, तसेच कराड अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न केंद्रात मांडत आहे. त्यालाही मंत्री पद मिळाल्यामुळे गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगामी मनपा निवडणुकीत देखील भाजपला कराड यांच्या मंत्री पदाचा फायदा देखील होऊ शकतो. तसेच केंद्रात कराड यांच्यामुळे मराठवाड्याला ओबीसी नेतृत्व मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून मिळत आहे. सध्या राज्यात ओबीसी आरक्षण प्रश्न जटील झाला आहे. त्यालाहि केंद्रात मांडण्याचा प्रयत्न डॉ. भागवत कराड करतील अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हटके अंदाजात सेहवागने धोनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?


