🕒 1 min read
Rida Rashid | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ताक्रार करणाऱ्या महिलेचं नाव रीदा राशीद (Rida Rashid) असं असून त्या भाजप (BJP) पक्षाच्या आहेत. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच याबाबत रीदा राशीद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी, मी भाजपची जरी असले, तरी भाजप म्हणून मला कमी लोकं ओळखतात, माझी खरी ओळख एक सामाजिक संस्था चालवणारी महिला, अशी आहे, असं रीदा राशीद यांनी म्हटलं आहे. मुंब्रा कळवा भागात रीदा राशीद एक सामाजिक संस्था चालवतात. या भागातील लोकं एक सामाजिक कार्य करणारी आणि एक एनजीओ चालणारी महिला म्हणूनच मला जास्त ओळखतात, असंही त्या म्हणाल्या.
जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हाताने धरुन पुरुषांवर ढकललं, त्यामुळे मी अवघडले होते, असा घणाघात राशीद यांनी केला आहे.
मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी रीदा राशीद यांच्याकडून करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli | विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, नक्की काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये?
- Jitendra Awhad | मोठी बातमी! आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar | “विनयभंगाचे कलम लावणे अतिशय भ्याड, सरकारने गुन्हा मागे घ्यावा” ; अजित पवार यांनी मागणी
- Chandrashekhar Bawankule | “जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करा”, चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांकडे मागणी
- Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

