Share

Virat Kohli | विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, नक्की काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषकातून (T20 World Cup) भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) काही दिवसांतच मायदेशी परतला. टी 20 विश्र्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघाचा दहा गडी राखून पराभव केला. हा लाजिरवाणा पराभव केवळ रोहित शर्मा किंवा विराट कोहलीलाच नव्हे तर कोट्यावधी भारतीयांना जिव्हारी लागला आहे. त्याचबरोबर भारताचा हा पराभव होताच अनेकांनी निराशाजनक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने सुद्धा विश्वचषकातून बाहेर पडतात ट्विटरवर एक निराशाजनक पोस्ट केली आहे.

आपल्याला झालेले दुःख आणि अप्रिय घटना सोशल मीडियावर शेअर करून दुःख व्यक्त करण्याची ही पद्धत आपल्याला आवडत नसल्याचे विराट कोहलीने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केले आहे. पंकज त्रिपाटी यांचा एका कार्यक्रमातला हा एक जुना व्हिडिओ विराट कोहलीने इंस्टाग्रामला शेअर करत आपल्या भावाना मांडल्या आहेत.

विराट कोहलीने शेयर केलेल्या स्टोरीमध्ये असे म्हटले गेले आहे की, ” आपण सगळे सोशल मीडियाचे बिनपगारी कामगार झालो आहोत.” या व्हिडिओमध्ये पंकज त्रिपाठी म्हणतात की, ” कुठलीही घटना घडली की काही सेकंदाच्या आत सोशल मीडियावर ती पोस्ट करून त्यावर प्रतिक्रिया देणे खूप महत्त्वाचा झाला आहे. पण आपल्या भावना लगेचच त्याच्या माध्यमातून व्यक्त करणे मला काही पटत नाही. कारण सोशल मीडियाने 1000 कर्मचारी पगार देऊन कामावर ठेवले आहेत. तर दुसरीकडे असे अनेक कर्मचारी सोशल मीडियावर फुकट काम करत आहे आणि ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी नेहमी सोशल मीडियावर भावना व्यक्त करायचे टाळत असतो.”

दुसरीकडे, काल झालेल्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये इंग्लंडच्या विजयानंतर विराटने एक खास स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरी मध्ये त्यांनी जोस बटलर आणि इंग्लंड संघाचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. टी 20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्युझीलँड दौऱ्यामध्ये हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!