Share

Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : हर हर महादेव शो जबरदस्तीने बंद केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ठाणे आयुक्तालयाच्या मुंब्रा पोलीस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. “ज्या प्रकारे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. चित्रपटगृहात ज्यांना मारहाण झाली तेच म्हणाले होते की जितेंद्र आव्हाडांनी त्यांना वाचवलं तरी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रभर आव्हाड यांना पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणे सरकारचे काम आहे. प्रत्येक व्यक्तिने संविधानाचा आदर केला पाहीजे. तसेच कालच्या पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या गाडी बाजुला असल्यामुळे आव्हाड रस्ता मोकळा करत होते. यावेळी त्यांनी एका भगिणीला बाजूला होण्यास सांगितले. या पलिकडे काहीही झालं नाही. तरी देखील गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री घटनास्थळी होते. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी”, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार भडकले- 

“अतिशय गलिच्छ असे प्रकार घडत आहेत. राजकीय वैचारीक मतभेद असू शकतात. मतमतांतर असू शकते, मात्र अशाप्रकारे घटना घडल्या तर महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नाहीत. यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते. राज्यातील प्रमुख प्रश्न बेरोजगारी, महागाई, प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. यात आरोप- प्रत्यारोप आताच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुरु आहेत. आव्हाडांवर असे कलम लावण्याचे कारण नव्हते पण एका लोकप्रतिनिधीला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. हा अतिशय भ्याड प्रकार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. जसे चार दिवस सासुचे तसे चार दिवस सुनेचे देखील असतात”, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार- 

“महत्वाच्या विषयाला बगल देण्याचे काम सुरु आहे. मी मुंबईला जाणार असून जितेंद्र आव्हाड यांची भेट घेणार आहे. नवीन कायदे-नियमांचा आधार घेऊन कोणी लोकप्रतिनीला बदनाम करण्याचे काम करत असेल तर जनतेने देखील जागृत होत ह्या गोष्टी पाहील्या पाहीजेत. सरकारने देखील चुंकल म्हणून सांगायचं धाडस दाखवायला पाहिजे. आव्हाडांवर जो चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा मागे घेतला गेला पाहीजे”, अशी माझी सरकारला आग्रही मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!