Share

Jitendra Awhad | मोठी बातमी! आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच संबंधित महिलेवर ऑस्ट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिदा रशिदा असं महिलेचं नाव असून त्यांच्यासह आणखीन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा भिष्माचार्य जगताप यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. छटपूजेच्या दिवशी मुंब्र्यातील मुंब्रेश्वर मंदिर परिसरात तलावाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. माझ्यासोबत माझे मित्रंही होते. त्यावेळी रिदा रशिदा, सिंदर मुमताज अहमद आणि इतर दोन तीन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या.

मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याबाबात सांगताना, काही वेळ मी बाजूला होते, कारण खूप गर्दी होती. साहेबांची निघण्याची वेळ होती, म्हणून मी त्यांना भेटायला गेले. मी भेटायला पुढे गेले तर आमदारांना माझी अडचण आली, का? कारण मी समोर होते. समोर असल्यामुळे त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिलं. ढकललं मला. आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला आहे. अशा आमदाराची मी निंदा करते, असं संबंधित महिलेने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!