Share

आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : बॉलिवूडचा किंग खानचा मुलगा आर्यन खानची गणना इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्समध्ये केली जाते. आर्यनने अजूनही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नाही. तरी देखील त्याच्या लोकप्रियतेच्या बाबतीत तो मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करतो. आर्यनच्या फोटोंची चर्चा देखील अनेकदा सोशल मीडियावर होत असते.

आर्यन खान आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. NCB च्या टीमने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या जहाजावर छापा टाकला आहे, ज्यात ड्रग्ज पार्टी चालली होती. त्यामध्ये बॉलिवूड, फॅशन आणि बिझनेस इंडस्ट्रीमधून अनेक सिलेब्रिटी त्या पार्टीत सहभागी होते. या पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एनसीबी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचीही चौकशी करत आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. समीर वानखेडे यांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली त्यात त्यांनी आर्यन खानचं देखील नाव घेतलं आहे.

समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण आठ जणांची चौकशी केली जात आहे. यावेळी त्यांनी  ‘आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची ड्रग्स पार्टी प्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. अरबाज मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा मित्र असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन आठवडे सुरु असलेल्या तपासाचा हा निकाल आहे. आम्हाला याबद्दल गुप्तचरांकडून माहिती होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असताना बॉलिवूड लिंक समोर आली असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!