Share

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचा विसर खुद्द शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाच पडला आहे. शिवसेना सचिव आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे नेते आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं. सोशल मीडियावर राऊतांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

‘या रस्त्यांसंदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे बाजू मांडलेली आहे. त्यांनीही तत्वत: मंजूरी दिलेली आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत’, असं विनायक राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी ओघात अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला. रस्ते विकासाच्या कामासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती देताना, राऊतांचा विसर सर्वांच्या लक्षात आला.

सध्या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. या आघाडीतील प्रत्येक मंत्री आमदार खासदार हे एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. बऱ्याच वेळा बोलताना ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे, त्याकडे कोणते पद आहे, याचंही भान नेत्यांना राहत नाही.  सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!