मालेगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पूरग्रस्त भागाची दौरा केला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत फडणवीस आणि दरेकर राज्याकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना करत आहेत. तसेच राज्य सरकारवर टीकाही करत आहेत. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस-दरेकरांना जोरदार टोला लगावला आहे.
पूर येऊन गेला. आमच्या सर्व पालकमंत्र्यांनी, संपर्क मंत्र्यांनी पाहणी केली. पंचनामे व्हायला लागलेत. शेतकऱ्यांना मदत व्हायला लागली. विरोधी पक्षनेते थोडे उशीरा जागे झाले. त्यांंनी पूर आल्या आल्या पाहणी केली असती तर त्यांना पूराची भीषणता, अतिवृष्टीची भीषणता लक्षात आली असती, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
मी बीड, जालना भागातील शेतकऱ्यांना भेटून परिस्थिती पाहिली. मला खात्री आहे आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी नक्की उभं राहिल, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून अनेकवेळा अतिवृष्टी होत आहे. ढगफुटी होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी करडून गेल्या आहेत. सर्व ठिकाणच्या पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पुढच्या काळात योग्य ती मदत सरकारकडून दिली जाईल, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’
- मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम


