कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर, जग्नीनपूरसह सरशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ममता बॅनर्जींनी सत्ता मिळवली मात्र, त्यांना विजयी होता आले नाही. आता भवानीपूर या मतदार संघात त्या पोटनिवडणुकीत उतरल्या आहेत. गुरुवारी मतदान पार पडले असून आज निकाल लागणार आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पार पडली असून त्यात भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी ३ हजार ६८० मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रियंका टिबरेवाल यांना पहिल्या फेरीत ८८१ मते मिळाली आहेत. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जीच निवडून येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या जागेसाठी ५३ टक्के मतदान झाले आहे. यात बहुतांष बोगस मतदान झाल्याचा अरोप भाजपाने केला आहे.
तर समशेरगंज येथे ५७.१५ तर जग्नीपूर येथे ५३.७८ टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान पद्दापुकुर येथील शाळेतील मतदान केंद्रावर बनावट मत करणाऱ्या दोघांना पकडल्याचा दावा भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. तसेच तृणमूलच्या नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी एक भाजपा समर्थकाला अटक झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाची एनसीबीकडून चौकशी
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा विनायक राऊतांना विसर; अशोक चव्हाणांना म्हणाले ‘मुख्यमंत्री’
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- ‘अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांची माती झाली, आज खरी ताकदीची गरज कोणाला आहे कोल्हे साहेब?’
- ‘ड्रग्स पुरवठ्यात कितीही बड्या धेंडांची मुले असो, कारवाई झालीच पाहिजे’ भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

