Share

शतकापूर्वीचं ऋतुराजचं सेलिब्रेशन; सर्वांनाचं झाली गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची आठवण

Published On: 

🕒 1 min read

अबुधाबी : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 विकेट्सनं पराभव केला. आयपीएल 2021 हंगामात शनिवारी डबल हेडरचा रोमांच रंगला. या दिवसातील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 17.3 षटकात 3 बाद 190 धावा करत चेन्नईवर दमदार विजय मिळविला.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली, पण डू प्लेसिस 7व्या षटकात 25 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेला सुरेश रैना नेहमीप्रमाणे फ्लॉप ठरला. यानंतर मोईन अलीने ऋतुराजला चांगली साथ दिली. ऋतुराज आणि मोईन अलीची जोडी मैदानावर जमली असतानाच मोईन 21 धावांवर बाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या 15 षटकांत 3 बाद 116 धावा झाल्या.

दुसरीकडे ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 101 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाने नाबाद 32 धावा करत त्याला सुरेख साथ दिल्याने 20 षटकांत 4 बाद 189 धावा उभारल्या. पराभवानंतरही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. ऋतुराजने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील पहिलं शतक झळकावलं.

https://twitter.com/5harmajiKaLadka/status/1444336130632019972?s=20

ऋतुराजला शेवटच्या बॉलवर शतक पूर्ण करण्यासाठी 5 रनची आवश्यकता होती. त्यावेळी त्यानं जोरदार शॉट लगावला आणि  बॉलकडं न पाहताच सेंच्युरीचे सेलिब्रेशन सुरु केले. ज्या ताकदीनं आणि वेगाने ऋतुराजनं हा शॉट मारला होता, त्याला माहित होते की तो सिक्सच जाणार. त्यामुळे त्याने शतकापूर्वीचं सेलिब्रेशन सुरु केले. ऋतुराजचं हे सेलिब्रेशन पाहून अनेकांना भारताचा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची आठवण झाली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये नीरजनं भाला फेक करताच सेलिब्रेशन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!