जोहान्सबर्ग – पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये प्रशासनानं जीवघेण्या मारबर्ग व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेत मरबर्ग व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
आफ्रिकेतील इबोला या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच कमी झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांतच एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आल्याचं पाहायला मिळालं होतं. दक्षिण गिनीच्या गुआकेडो प्रांतात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
इबोला आणि कोरोनापेक्षाही हा विषाणू घातक असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. या विषाणूचा संसर्ग जनावरांपासून माणसांमध्येही होऊ शकतो असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गिनी देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू वटवाघुळांमार्फत पसरतो.
या विषाणूच्या संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर हा 88 टक्के आहे. 2 ऑगस्ट 2021 गिनी देशातील साउथ गुएकेडो भागात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याला इबोलाची लागण झाली होती का हे पाहण्यासाठी त्याच्या मृतदेहाची तपासणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील १,२८,३३५ शाखा फडकविणार राष्ट्रध्वज
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना


