मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १,२८,३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. अभाविप भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण वर्षभर इंटर्नशिप, शोभा यात्रा, सोशल मीडिया मोहीम, न सांगलेल्या नायकांवरील लघुपट (Unsung Heroes) इत्यादी योजनांवर देखील काम करणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारी बैठक दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी भोपाळमध्ये आभासी आणि थेट माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, आगामी वर्षासाठी योजना, अभियान आणि कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली. अभाविप राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जलद अंमलबजावणीसाठी प्रत्येक प्रांतात समिती स्थापन करणार आहे. ही समिती त्यांच्या राज्यांतील सरकार, प्रशासन आणि विद्यापीठांना सूचना पाठवेल आणि त्यांच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहील.
वर्ष २०२२-२३ मध्ये अभाविपचा ही ७५ वा वर्धापन दिन आहे , त्या निमित्ताने अभाविपने पुढील दोन वर्ष मोठ्या अभियानांचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी एक व्यापक मोहीम चालवण्यात येईल. या व्यतिरिक्त, ‘परिषद की पाठशाळा’ या उपक्रमाचा विस्तार करण्याचा, देशभरातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी ‘ऋतुमती’ या अभियानाला आयाम म्हणून स्थापना करण्याचा कार्यकारी परिषदेत निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत दोन ठराव आणि एक आवाहन पारित करण्यात आले. प्रस्ताव क्र.१ मध्ये कोरोना कालावधीत शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करून, केंद्र आणि राज्य सरकारांकडून उपायांची मागणी करण्यात आली आणि प्रस्ताव क्र.२ मध्ये देशातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करून निराकरणाची मागणी करण्यात आली. अभाविप देशभरातील तरुणांना या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचे आणि आजपर्यंत न सांगलेल्या वीरांचे देखील स्मरण करण्याचे आवाहन करते .
अभाविप च्या राष्ट्रीय महामंत्री, निधी त्रिपाठी म्हणाल्या, एक दिवसीय बैठकीत कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्राला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, या आव्हानांवरील उपायांवर विस्तृत चर्चा झाली. या वर्षी भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि यासाठी एक विशेष अभियानाची योजना करण्यात आली आहे .स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये देशातील प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा हाच आमचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यातील मंदिरे अद्याप उघडणार नाहीत, थोडी वाट पहावी लागेल’- राजेश टोपे
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

