मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधीक पदके पटकावली. या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकाची कमाई केली. या पदकविजेत्यांचा घेतलेला हा आढावा. यातील दुसरी पदकविजेता खेळाडू पी व्ही सिंधु.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधुने रौप्यपदक पटकावले होते. यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधुकडून सुवर्णपदाकची आपेक्षा होती. अपेक्षेनुसार सिंधुने पहिल्या फेरीतील दोन्ही सामन्यात इस्राईलच्या क्सनिया पोलीकरपोवाला आणि हाँग काँगच्या च्युंग नांगन यी ला पराभूत करत बाद फेरीत प्रवेश मिळवला. यानंतर उपांत्य फेरीत सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा विजयाचा धडाका सुरुच होता. या लढतीत जपानच्या अकाने यामागूचीला पराभुत करत सिंधूने उपांत्यफेरीत जागा मिळवली.
उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करण्यापुर्वी सिंधुने एकही सेट गमावला नव्हता. त्यामुळे या सामन्यात सिंधुच विजयी होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने उपांत्य फेरीत सिंधुला चायनाच्या टाय झू यिंग विरुद्ध पराभव स्विकारावा लागला. यामुळे सिंधकडे आता कांस्यपदक जिंकण्याची संधी होती. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधुने चायनाच्या टाय झू यिंगपराभुत करत सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारी पहिली महिला खेळाडू ठरली.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला दारूच्या बाटल्यांचा खच
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
