मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच मानेची शस्त्रक्रिया पार पडली. मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबावर आणि पवार कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.
वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला आहे. वरूण सर्देसाईला भांडी घासायला नेला आहे का?? त्याचं काय काम?? मोदी साहेब पंतप्रधान असून शासकीय दौरे २ ते ३ दिवसात आटपतात पण महाराष्ट्र कर्जबाजारी असून सुद्धा याचे दौरे संपत नाही, जनतेचा पैसा आहे तो ठाकरे पवार कुटुंबाचा नाही, असं म्हणत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.
वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला आहे. वरूण सर्देसाई ला भांडी घासायला नेला आहे का?? त्याचं काय काम?? मोदी साहेब पंतप्रधान असून शासकीय दौरे २ ते ३ दिवसात आटपतात पण महाराष्ट्र कर्जबाजारी असून सुद्धा याचे दौरे संपत नाही, जनतेचा पैसा आहे तो ठाकरे पवार कुटुंबाचा नाही. pic.twitter.com/TnovBZnVi8
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 16, 2021
दरम्यान, राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. या दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार कटके उडताना आपण वारंवार पाहतो. आदित्य ठाकरेंचा परदेश दौरा आणि मुख्यमंत्र्यांची झालेली शस्त्रक्रिया यावरुन निलेश राणेंनी ठाकरे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला शिवसेनेकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सुरळित होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्वाची भूमिका
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया


