Share

लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था सुरळित होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची महत्वाची भूमिका

Published On: 

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी बँकांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात झालेल्या आर्थिक नुकसानीचे त्याच सोबत त्यातून सावरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना या बद्दल चर्चा केली जाणार आहे. ही दोन दिवसीय बैठक असणार असून, या बैठकीला एचडीएफसी बँक, आयसीआसी बँक, कोटक महिंद्रा बँक, चोलामंडल इन्वेस्टमेंट, श्रीराम ट्रांसपोर्ट फायनांस आणि टाटा कॅपिटल यांचे सीईओ सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी बँकांची भूमिका काय असावी या विषयावर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. स्टार्टअपला कशा पद्धतीने जास्तीत जास्त कर्ज दिले जाऊ शकते आणि आर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे, अशा अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे. मंगळवार आणि बुधवार अशी दोन दिवस ही बैठक होणार आहे.

लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या उद्योजकांना पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख बँकांकडून कर्ज शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून ३१ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ६३,५७४ कोटी रुपयांचे लोन वाटप करण्यात आल्याची माहिती बँकांच्या वतीने देण्यात आली. देशातील ३.२ लाख लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!