🕒 1 min read
रत्नागिरी : कृषी पणन मंडळ उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहे. यावर्षी हा उपक्रम यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे. हापूस नावाखाली इतर आंब्यांची विक्री केली जाते. व लोकांची फसवणूक होते. ही फसवणूक आता टळणार आहे. ग्राहकांना आता अस्सल हापूस आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे.
भौगोलिक नामांकित असलेल्या हापूस आंब्याचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पणन मंडळाच्या उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी सांगितलेल्या माहिती नुसार, केवळ काही भागातचं नाही तर राज्यातही सर्व ठिकाणी हापूस आंब्याचे स्टॉल उभारले जाणार आहेत. व याच्या नोंदणी ७ मार्चपासून सुरु करण्यात करण्यात येणार आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी यंत्रणा देखील राबविली जात आहे. तसेच आंबा बागायतदारांना आंब्याचे स्टॉल उभा करायचे त्यांनी रत्नागिरी येथील कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
स्टॉल नोंदणीसाठी हि कागदपत्रे गरजेची –
१) आंबा कलमी नोंदी सातबारा उतारा
२) आधार कार्ड
३) स्टॉल विक्री करणाऱ्या कुटुंबाचे आधार कार्ड
४) कोरोना लस घेतलेले प्रमाणपत्र
५) भौगोलिक मानांकन नोंदणी प्रमाणपत्र इ.
तसेच पणन मंडळाच्या नावाने १० हजार रुपये धनादेश अदा करावा लागेल. रक्कम भरलेली पावती आर्जासोब्त द्यावी लागेलयानंतर तुम्हाला स्टॉल उभा करण्यासठी परवानगी दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
