🕒 1 min read
मुंबई: मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) हे NCB केसचा पुन्हा एकदा तपास करत आहेत. या निर्णयाचं स्वागत आहे, असं भाजप नेते मोहित कंबोज भारतीय म्हणाले. या केसमध्ये सुनील पाटील, किरण गोसावी, नवाब मलिक ते शिवसेनेचा एक मंत्री याच बरोबर काँग्रेसचे असे कोणते आमदार यात होते याचा तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मोहित कंबोज (Mohit Kamboj) पुढे म्हणाले, दुध का दुध और पानी का पानी झालं पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलवा माझ्याकडे याचे सर्व पुरावे आहेत. यात सहभाग असलेली लोकं अजूनही अधिवेशनात बसली आहेत. त्यांचा यात काय रोल आहे, हे संपूर्ण जगापुढे यायला हवं. मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Russia-Ukraine war : खोट्या बातम्यांवर आवर आणण्यासाठी रशियाचा मोठा निर्णय; फेसबुकवर बंदी तर..
-
“महाराष्ट्रात सत्ता येत नाही म्हणून…”, फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
-
शेन वॉर्नच्या निधनानंतर सौरव गांगुलीचे चाहत्यांना आवाहन म्हणाला “आरोग्याला…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
