Share

Russia-Ukraine war : रशिया युक्रेनसोबत चर्चेला तयार; ‘या’ तीन मागण्या ठेवली अट

Published On: 

नवी दिल्ली : आज रशिया-युक्रेन युद्धाचा १० वा दिवस आहे. मात्र अजूनही युद्ध सुरूच आहे. दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी शुक्रवारी (४ मार्च) युक्रेनवरील युद्धाच्या ९ व्या दिवसात कोणताही मोठा विजय न मिळाल्याने मोठे विधान केले आहे. पुतिन यांनी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपांना नकार देत त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास युक्रेन सोबत चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे.

पुतिन यांनी हे वक्तव्य वक्तव्य जर्मनीचे चांसलर ओलाफ सोल्झ यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान केले. युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या बातम्या हा मोठा अपप्रचार असल्याचे पुतीन यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच युक्रेनने आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही वाटाघाटी करण्यास तयार असल्याचेही पुतीन यांनी म्हटले आहे.

यामध्ये रशियाचा भाग म्हणून क्रिमियाला मान्यता देणे आणि पूर्व युक्रेनच्या फुटीरतावादी प्रदेशांचे सार्वभौमत्व या अटींचा समावेश आहे. दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्यात आतापर्यंत दोन वेळा चर्चा झाली आहे. मात्र अजूनही यातून कोणताही मार्ग काढण्यात आला नाहीये. तर युक्रेनमधील प्रमुख शहरांना रशियन लष्कराकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आता युक्रेन रशियाच्या या मागण्या मान्य करेल का, याबाबत अजून तरी शास्वती मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!