Share

ऊर्जामंत्र्याचे अपयश झाकण्यासाठी चीनवर खापर फोडण्याचा प्रयत्न होतोय ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. नागपूर येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बावनकुळे म्हणाले की, 12 ऑक्टोबर 2020 रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचे कारण देत जनतेची दिशाभूल करणे सुरू केले आहे. एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएस अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचे नमूद करतात.अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गृहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत हे अत्यंत गंभीर आहे. जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खाते आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणे राज्य सरकारला महत्त्वाचे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते.

12 ऑक्टोबरपूर्वी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार वाहिन्यापैकी दोन वाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे सगळा भार हा कळवा- पडघा या तिसऱ्या वाहिनीवर येऊन ती वाहिनी 12 ऑक्टोबरला सकाळी बंद पडली आणि त्यानंतर चौथी वाहिनी ही खारघर येथील ऑपरेटर्सकडून स्वत:हून बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुरूस्तीचे काम केले नाही, समन्वयाचा अभाव असल्यामुळे मुंबई काळोखात बुडाली हे सत्य आहे.

जनतेला 100 युनीट पर्यंतची मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण न करणे, भरमसाठ वीज बिल रद्द करण्याचे आश्वासन पूर्ण न करणे, कनेक्शन खंडित करण्याच्या नोटिसांमुळे संतप्त झालेली जनता यातून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चीनवर सायबर हल्ल्याचा आरोप करून जनतेची फसवणूक करून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न महाविकासआघाडी सरकारकडून होत आहे आम्ही याचा तीव्र निषेध करतो असेही बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!