मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारची कोंडी करत असल्याचं दिसून येत आहे.
अधिवेशन सुरु असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. यासाठी ते विधान संभवन परिसरात दाखल देखील झाले होते. मात्र, ही भेट होऊ शकली नाही. याचं कारण आता समोर येत आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. सरकारमधील मंत्र्यांना देखील गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी म्हणून विधान भवनात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी करणे बंधनकारक आहे. कोरोना अहवाल असल्यासच नेत्यांना विधान भवनात प्रवेश दिला जात आहे.
राज ठाकरे यांनी कोरोना चाचणी न केल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही. दरम्यान, राज ठाकरे हे मास्क देखील घालत नसल्याने विधानभवन परिसरातील कोरोना नियमांची पूर्तता करण्यासाठी तरी ते मास्क घालणार का ? अशी चर्चा होती. मात्र, RTPCR चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंनी विधान भवनात येणं टाळलं. राज ठाकरे हे वीजबिले, तसेच अन्य काही प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र विनामास्क आणि विना RTPCR चाचणी प्रवेश नाही याची त्यांना माहिती मिळाली. यामुळेच ते भेट न घेताच परतल्याच बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचे भरपूर फायदे
- मिटकरी भावा तू आता आला,माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार
- ‘तुम्ही सीएम मटेरियल आहात, एखाद्या राज्यमंत्र्यांसारखं वागू नका’
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?


