🕒 1 min read
बुलडाणा: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत हे सध्या विष ओकत आहेत, काँग्रेस सोबत युती झाली तर पक्षामध्ये आपले महत्त्व कमी होईल हा त्रास त्यांना सध्या जाणवत असल्याने बुलडाणा जिल्ह्यात येऊन राऊत हे प्रकाश आंबेडकरांवर बेछूट आरोप करीत आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी सांगितलं.
मात्र हे आरोप करीत असताना राऊतांनी स्वतःच्या चारित्र्य कडे पहावे असे प्रतिउत्तर देत, नितीन राऊत हे सध्या मानसिक रोगी झालेले असून त्यांनी अकोल्याच्या मानसोपचार तज्ञाकडे उपचार करावा, त्याचा संपूर्ण खर्च वंचित बहुजन आघाडी करेल असा घणाघात वंचित चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
राज्यातील १४ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल होणार; नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली
-
भारतीय दूतावासाची काहीही मदत नाही; युक्रेनवरून भारतात परतलेल्या विद्यार्थिनीने व्यक्त केल्या भावना
-
हायकोर्टाकडून मलिकांना दिलासा नाहीच; पुढील सुनावणी ७ मार्चला
-
‘…जनतेच्या कराच्या पैशाची चहा तुम्हाला गोड कशी लागेल’; अतुल लोंढेंचा फडणवीसांना टोला

