Share

राज्यातील १४ जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल होणार; नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. याआधारे राज्य सरकारने राज्यात कोरोना संदर्भातील जे नियम लावले होते ते ते नियम शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने काही जिल्यांचा ए श्रेणीत तर राहिलेल्या जिल्यांचा बी श्रेणीत उल्लेख केला आहे. ए श्रेणीमध्ये येणाऱ्या एकूण १४ जिल्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. येणाऱ्या ४ मार्चपासून नवीन नियम लागू होतील.

या १४ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार –

पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा रत्नागिरी, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.

हे निर्बंध शिथिल होणार –

१) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, इ. विविध उत्सवाशी संबंधित कार्यक्रम ५० टक्के क्षमतेनं घेण्यास परवानगी तसेच लग्न आणि अंत्यसंस्काराच्या विधीचा देखील समावेश आहे.
२) शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी
३) होम डिलिव्हरी सेवा सुरू
४) शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, पर्यटनाची ठिकाणे, इ. १०० टक्के क्षमतेनं सुरू
५) जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासासाठी पूर्ण लसीकृत झालेल्या व्यक्तीला परवानगी
६) खासगी आणि सरकारी कार्यालयांना परवानगी
७) याशिवाय, अ श्रेणीमध्ये सार्वजनिक ठिकाणी १०० टक्के क्षमतेनं कामकाजाची मुभा इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!