औरंगाबाद: शहरालगत असलेल्या मिटमिटा परिसरातील फौजी ढाब्या समोर झाडाची फांदी अंगावर पडल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. अंधारामुळे चालकाला काहीच अंदाज न लागण्याने चालक जखमी झाला आहे. या घटनेमुळे काही काळ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत माहिती अशी की, रात्रीच्या वेळी या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर असते. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्राफिक पोलीस बी.ए.बोर्डे, शिवाजी गायकवाड ,अँड अशोक मूळे, सदबीरसिंग रंधावा यांच्या प्रयत्नाने दहा लोकांचा जीव वाचला आहे. या सर्वांनी मिळून वेळीच वाहतूक थांबवली व काही वेळात रस्त्याच्या एका बाजूने वळवली. त्यानंतर अग्निशमक दलाच्या वतीने फांदी बाजूला सरकवण्याचे काम सुरू आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर अशी घटना झाल्याने झाडांचे योग्य सर्वेक्षण करत त्यांची गरज असेल तर कापणी करणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. तसेच येत्या काळात अशा घटनांमूळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, असे देखील वाहतूक कोंडी मध्ये अडकलेले नागरिक बोलून दाखवत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- म्हणून उद्योग बंद करण्याची गरज नाही – जिल्हाधिकारी चव्हाण
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
