औरंगाबाद : शहरची आर्थिक घडी आद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे. मागीलवेळी कोरोनावाढीसाठी काही कंपन्या जबाबदार ठरल्या होत्या. म्हणून, यावेळी आम्ही उद्योगक्षेत्रांना सर्व नियम पाळण्याच्या कडक सूचना केलेल्या आहेत. आणि त्या ते पाळतदेखील आहेत. उद्योग बंद करण्याची तूर्तास तरी गरज वाटत नाही. मी अनेक कंपन्यांमध्ये पाहणी केली असून तेथे सर्व नियम पाळले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, शहरातील १० हजारांहून अधिक कामगार कंपन्यांशी संलग्नित आहेत. या सर्वांचा विचार करणे गरजेचे आहे. कंपन्या आपआपल्या कामगारांच्या टेस्टिंग करत आहेत. मास्क वापरणे बंधनकारक केले आहे, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे. यातून कंपन्या आवश्यक ती काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी कंपन्यांच्या बसमध्ये असलेल्या प्रवाशी संख्येबाबत होणाऱ्या उल्लंघनाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, वसाहतींमधून कंपन्यांमध्ये जाताना बसेसमध्ये मर्यादित संख्येबाबत बंधने घालण्यात येतील, तसेच प्रत्येक बस परिवहन विभागातर्फे, पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याकडून देखील मोठ्या प्रमाणात या बसेसची नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा; पटोलेंची आक्रमक भूमिका
- लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले, सरकारने त्यावर मीठ चोळले!
- ‘मुकेश अंबानींनी लाखो लोकांना रोजगार दिलाय; एनआयएची कारवाई योग्यच !’
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ! एनसीबीची सुप्रिम कोर्टात याचिका; १८ मार्चला सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
