Share

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात तर, उपकेंद्र बारामतीत होणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे करण्यात येणार आहे. तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात तर उपकेंद्र बारामती येथे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूरचे कार्यक्षेत्र आहे. विद्येचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

या उपकेंद्रासाठी पुण्यात लवकर जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच विश्वविद्यालयाच्या कुलगुरुंनी या उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या उपकेंद्रात संस्कृत भाषा, संस्कृत भाषांतर आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि इंडोलॉजी शिकविण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र बालेवाडी-पुणे येथे केल्याने याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखील होईल. या विभागीय केंद्राचा उपयोग एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे.

बारामती येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी शासनाची जागा तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. बारामती मधील उपकेंद्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासह ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा लाभही विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!