मुंबई – गेले काही दिवस राज्य सरकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असलेल्या जोरदार आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहे. या सर्व घडामोडींचे बुधवारी मंत्रिमंडळ आणि त्यानंतर वर्षावर झालेल्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. महाविकास आघाडीची प्रतिमा ठरवून मलिन करण्याचा प्रयत्न सुरु असून फडणवीस यांना आता जशास तसे उत्तर द्यायला हवे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आपल्या मंत्र्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी पुढे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. अँटिलिया-सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंग यांचे आरोप, रश्मी शुक्लांच्या अहवालाच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केली असताना आता त्यांना एकत्रितपणे जोरदार प्रत्युत्तर देण्याचा निर्धार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
दरम्यान,कॉंग्रेसचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व घटनांमुळे नाराज असल्याचे वृत्त माध्यमांमधून आले होते.काँग्रेसचे प्रभारी पाटील यांनी राज्यातील परिस्थितीबद्दल एक आढावा मागवला आहे. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही चर्चा नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड – बंगळुरू, ओखा – रामेश्वर उत्सव विशेष रेल्वेला दिली मुदतवाढ
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- अभिनेता अजय देवगणनं बदललं स्वतःचं नाव?


