मुंबई : अभिनेता रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे त्या सोबत आलिया भट देखील चर्चेत आहे. हे दोघे आता फक्त चांगले मित्र नाही तर आता ते मैत्रीच्या नात्या पलीकडे म्हणजे अगदी लग्नबंधनात अडकण्यापर्यंत गेले आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेला चांगलचं उधान आलं आहे. रणबीरची आई नीतू सिंग कपूर तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाली आहे. त्यांच्या लग्नाच्या तयारीला देखील नितुने सुरुवात केली आहे.
नीतू सिंग कपूर रणबीर आणि आलियाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात डान्स करणार असून सध्या त्याची रिहर्सल करत आहेत. त्यांचा रिहर्सलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नितु कपूरचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CGEHvXAJ1nk/?utm_source=ig_web_copy_link
रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील गाण्यावर त्या राजेंद्र सिंग म्हणजेच मास्टरजी यांच्यासोबत रिहर्सल करताना दिसत आहेत. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असली तरी हे लग्न यावर्षी होणार नाहीये बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार रणबीर आणि आलिया यांनी ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच लग्न करण्याचे ठरवले आहे. पण ते लवकरच लग्न करतील असा अंदाज नेटिझन्सकडून लावण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड – बंगळुरू, ओखा – रामेश्वर उत्सव विशेष रेल्वेला दिली मुदतवाढ
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- अभिनेता अजय देवगणनं बदललं स्वतःचं नाव?


