मुंबई : मुंबई इंडियन्सचे खेळाडू कृणाल आणि हार्दिक पांड्या यांच्या वडिलांच्या निधनानंतर आता संघातील आणखी एका खेळाडूचे पितृछत्र हरवले. वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या वडिलांचे निधन झाले आहे. पोलार्डने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.
पोलार्डने वडिलांसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याने लिहिले की,”तुमच्या आत्म्याला शांती मिळो. तुमच्यावरील प्रेम सदैव कायम राहिल. तुम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करतच राहू. तुम्ही चांगल्या ठिकाणी असेल, हे मला माहित आहे.”
https://www.instagram.com/p/CMyBjLupT8i/?utm_source=ig_web_copy_link
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पोलार्डच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. ” तुझ्या वडिलांच्या निधनाची बातमी समजली आहे. या दु:खाच्या प्रसंगी मी शोक व्यक्त करतो. देव तुम्हाला या सामर्थ्य देईल”, असे सचिनने ट्विट केले.

महत्त्वाच्या बातम्या
- कुंबळे-कोहली पुन्हा आमने-सामने
- ‘महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते’
- ‘मोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे’
- श्रेयस अय्यरला दुखापत ; उर्वरित वन डे मालिकेमधून बाहेर
- औरंगाबादमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन लावायचा की नाही; आज होणार निर्णय!

