कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जींना १० मार्च रोजी एका प्रचारसभेदरम्यान पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या व्हीलचेअर वरून प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या दिसल्या यावरून भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त टीका केली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप घोष यांनी या विधानामध्ये थेट ममता बॅनर्जी यांचं नाव न घेता प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, “त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल”, असं दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केल आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे.
@BJP WB Pres asks in public meeting why Mamatadi is wearing a saree, she should be wearing “Bermuda” shorts to display her leg better
And these perverted depraved monkeys think they are going to win Bengal?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 24, 2021
यानंतर या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण असून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलीप घोष यांच्यावर टीका केली आहे. “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जाहीर सभेमध्ये विचारतात की ममता दीदी साडी का नेसतात? त्यांनी बर्मुडा घातला पाहिजे, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल. आणि या माकडांना वाटतं की ते बंगालमध्ये जिंकतील?” असं मोइत्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नांदेड – बंगळुरू, ओखा – रामेश्वर उत्सव विशेष रेल्वेला दिली मुदतवाढ
- एकदिवसीय सामन्यांत शिखर धवन सहाव्यांदा नर्व्हस नाइंटीचा बळी
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- अभिनेता अजय देवगणनं बदललं स्वतःचं नाव?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

