कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.
भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत. कॉंग्रेसची या निवडणुकीत डाव्यांच्या सोबत आघाडी आहे तर एमआयएम देखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे.यामुळे ममता बॅनर्जी यांना भाजपाबरोबरच एमआयएम ,काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीविरोधात लढावे लागणार आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जींना १० मार्च रोजी एका प्रचारसभेदरम्यान पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या व्हीलचेअर वरून प्रचाराच्या रिंगणात उतरलेल्या दिसल्या यावरून भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त टीका केली आहे.
It now appears that the role of @BJP4Bengal State President has been merely reduced to that of venom-spitting. From scathing attacks towards the CM of Bengal to violence towards @AITCofficial workers – he has conveniently crossed all limits.
Shocking words, once again! pic.twitter.com/cBolkvpJvF
— Dr. KakoliGDastidar (@kakoligdastidar) March 24, 2021
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप घोष यांनी या विधानामध्ये थेट ममता बॅनर्जी यांचं नाव न घेता प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, “त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल”, असं दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केल आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कुंबळे-कोहली पुन्हा आमने-सामने
- ‘महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता गाजवू इच्छिते’
- ‘मोदी सरकारने लोकशाही आणि स्वातंत्र्याचा गळा घोटायचा हे ठरवूनच टाकले आहे’
- श्रेयस अय्यरला दुखापत ; उर्वरित वन डे मालिकेमधून बाहेर
- औरंगाबादमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन लावायचा की नाही; आज होणार निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

