Share

ग्रामीण रुग्णालयांनी उपचार सुविधांसह सज्ज राहण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सुचना

Published On: 

औरंगाबाद :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि वाढीव रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तसेच ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह खाटांची संख्या तातडीने वाढविण्याचे निर्देश रविवारी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीदरम्यान दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊनची अंमलबजावणी व ग्रामीण भागातील सेरो सर्वेक्षणा बाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत व्हीसीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, सर्व उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, आप्पासाहेब शिंदे, संगिता सानप, मंदार वैद्य, संगिता चव्हाण आदींची या वेळी उपस्थिती होती.

ग्रामीण भागात विशेषत: आठवडी बाजार भरणाऱ्या गावांमध्ये लसीकरणावर अधिक भर द्यावा. यामध्ये पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांची मदत घेऊन लोकांपर्यत संपर्क करत विश्वासाचे वातावरण निर्माण करुन गावांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच 25 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात. संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गावागावात जाऊन सर्वांचा चाचण्या तातडीने करुन घ्याव्यात. प्रतिदिवशी 100 चाचण्या करण्याच्या दृष्टीने सक्रिय व्हावे. संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची अधिक व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने लसीकरण पथक, जनजागृती पथक, मुख्य निरीक्षक, लॉक डाऊन निरीक्षक नेमावे ही जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांची राहील असे निर्देशीत केले. नंतर जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुम, लॉकडाऊन सुपरवायझर, निरीक्षकांच्या ऑर्डर काढाव्यात. गरजूंना एनजीओंच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करुन द्यावे.  शिवभोजन थाळीची देखील संख्या वाढवावी. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना तात्काळ औषधोपचारांची मदत मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून या काळात जनतेला आवश्यक गोष्टींसाठी त्रास होणार नाही याची काळजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे.

तसेच आवश्यकता असेल त्या ग्रामीण भागात संबंधितांनी रोज भेटी द्याव्यात. या ठिकाणी लग्नसंमारंभ मोठ्या प्रमाणात होत नाही ना ? याकडे सरपंच, ग्रामसेवक यांनी लक्ष ठेवावे. जर येथे नियमांचे उल्ल्ंघन होत असेल तर वेळप्रसंगी गुन्हेदेखील दाखल करण्याच्या सूचना देऊन सारीच्या सर्वेक्षणामध्ये जे शिक्षक टाळाटाळ करतील, अथवा गलथान कारभार करतील त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना यावेळी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!