🕒 1 min read
मुंबई : भाजपच्या खासदार डॉ. हिना गावीत यांनी शिवसेनेसह काँग्रेस नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या संबंधी माहिती देण्यासाठी त्यांनी दुपारी १२ वाजता ऑनलाईन पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारीच शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांना रेमडेसिवीर औषधी विक्री करण्यासाठी देत असल्याचे पुरवे त्या दाखवण्याची शक्यता आहे.
राज्यात कारोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार सुरू आहे. तशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने यातील काही आरोपींना जेरबंद देखील करण्यात आले आहे. मात्र, तरी देखील रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी भटकंती करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत खासदार डॉ. हिना गावीत करत असलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे आहेत. आधीच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात रेमडेसिवीरवरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात या आरोपाचे पुरावे जर हिना गावीत यांच्याकडे असतील तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रोखण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला
- बीडमधील रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखा, पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र
- मुंब्र्यातील रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीची किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
- नांदेड जिल्ह्यातील ६६ गावे कोरोनामुक्त
- ब्रेक द चेन! नांदेड जिल्ह्यात ३ लाख जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
