नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असतांना दुसरीकडे अनेक गावांची वाटचाल ही कोरोना मुक्तीकडे होत असल्याचे आकडेवाडीतून स्पष्ट होत आहे. ही बातमी दिलासादायक असली तरीही ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याने त्या ठिकाणी बोटावर मोजण्या इतकेच लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील भीती व सोशल मीडियातून पोहोचलेला चुकीचा संदेश दूर करण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने आरोग्य विभागाला लसीकरण मोहीम राबविताना नाकी नऊ आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच माहूर तालुक्यातील ९२ गाव पैकी ६६ गावात सध्या कोरोना संसर्ग झालेला एक ही रुग्ण नाही. ग्रामीण भागातील २६ गावातील ५२ बाधित होम आयसुलेट असून २६ बाधितांवर माहूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहे. तर माहूर शहरातील ३० रुग्ण होम आयसोलेट असून ११ बाधीत कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत.त्या मुळेच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
त्यामुळे अनेकांना उपचाराअभावी आपले जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थितीतही कोरोना महामारीच्या काळात माहूर तालुक्यातील ९२ पैकी ६६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. ही बाब नक्कीच दिलासादायक आहे, परंतु गावात ग्रामपंचायत, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या महत्त्वाच्या घटकाकडून कुठल्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने संपूर्ण भार हा आरोग्य विभागावर येऊन पडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चौकशीची खूपच घाई असल्यास प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरं देईन’
- आखेरच्या चेंडुपर्यंत रंगलेल्या सामन्यात एका धावेने आरसीबीने दिल्लीवर केली मात
- रुग्णालयातील अग्नितांडव थांबेना;मुंब्रा येथे चार रुग्णांचा होरपळून मृत्यू
- परभणी जिल्ह्यात १०३३ कोरोना बाधित, २० रुग्णांचा मृत्यू, नागरिकांनो काळजी घ्या
- महिलेचा नातेवाईकाकडून विनयभंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

