Share

ब्रेक द चेन! नांदेड जिल्ह्यात ३ लाख जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

Published On: 

नांदेड: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण सर्वात प्रभावी योजना आहे. लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनाने देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या ३१ लाख ८७ हजार ७८५ तर शहराची लोकसंख्य ६ लाख ७७ हजार ३४५ इतकी आहे. ग्रामीण भागात २ लाख ५५ हजार ४३ तर नांदेड शहरात ६० हजार २१४ असे एकूण ३ लाख १५ हजार २५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना संकटावर आता लसी उपलब्ध झाल्या आहेत. या लसीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांचे सहकार्य व पाठबळ आवश्यक आहे.

लसीकरणात लस घेतलेल्या नागरीकांपैकी एकही जण दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. मात्र,लस घेतल्यनंतर काही जणांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये प्रामुख्याने लसीकरणानंतर मास्क न वापरणे, बेफिकीरपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना न करणाऱ्यांचा समावेश आहे. तथापि, गंभीर कोरोना होण्यापासून लसीकरण झालेल्यांचा बचाव झाला आहे, असे प्राथमिकत: निदर्शनास आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!