Share

गंगापुर कोविड केअर सेंटर मधील सुविधांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले समाधान

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. या लॉकडाऊनची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी तसेच गंगापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर, कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी (दि.१४) केली.

यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड हॉस्पिटलमधील उपचार सुविधा, स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणारे जेवण, त्यांच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याच बरोबर कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी आपल्याला पूर्ण क्षमतेने कोरोना विरुद्ध लढायचे आहे असे सांगत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व इतर सर्व फ्रंटलाइन कर्मचारी यांनी पूर्ण ताकदीने उभे राहण्यासाठी त्यांनी त्यांचे मनोबल वाढवले.

यात काही अडथळे आल्यास ते सोडविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे सांगितले. कोरोनाशी सामना करतांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी आपले सुरक्षा कवच म्हणून लसीकरण करून घेण्याचेही सांगितले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी कोविड केअर सेंटर मधील रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या उपचार सुविधा, जेवण याबाबत चौकशी केली.

तसेच लॉकडाऊन लागू असताना काही नागरिक रस्त्यावर विनामास्क फिरतांना आढळून आले त्यांच्यावर लगेच जिल्हाधिकारी यांनी दंडात्मक कार्यवाही केली व यापुढे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे व इतरांना सांगणे याबाबत सूचित केले. तसेच नियम न पाळणार्‍यांविरुद्ध आणि विनामास्क फिरणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही संबंधित विभागाला दिले.

यावेळी यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, तहसीलदार माणिक अहिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री झीने तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!